गुलाबाची आंतरमशागत आणि छाटणी..

गुलाबामध्ये शेंडा खुडणे ही क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यामुळे रोपांना अनेक फांद्या |फुटवे येतात. उप फांद्यांची जाडी वाढते. तसेच लांब दांड्याच्या फुलाचे उत्पादन चांगले येते. जरुरीप्रमाणे  शेंडा फुटण्याचा प्रकार आणि पद्धत यामध्ये बदल केला तरी चालतो. नवीन लावलेल्या गुलाब रोपांच्या
बुंध्यापासून २ ते ३ मोठे चांगल्या जाडीचे फुटते तसेच अनेक लहान लहान फुटवे येतात. अशा फुटव्यांची
जाडी वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ते सर्वसाधारणपणे ३ से.मी. लांबीचे असतांना शेंडा खुडल्यास परिमाणकारक वाढू शकते.
आंतरमशागत / वळण आणि छाटणी :
आंतरमशागत : गुलाबाची आंतरमशागत करताना खालील बाबींचा समावेश होतो.
१) निंदणी / खुरपणी
२) वाफ्याची बांधणी
३) वेळोवेळी छाटणी
४) मर झालेल्या फांद्यांची काढणी
५) औषधांची नियमित फवारणी
६) रोपांना आधार देणे
७) शेंडा खुडणे
रोपांना आधार देणे-
रोपांची वाढ होत असताना व झाडांना फुले सरळ उंच राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वाफ्याच्या समांतर ३ मी. अंतरावर जमिनीत वाफ्याच्या दोन्ही बाजूस लाकडी खांब पक्के बसवून घ्यावे.नंतर या खांबांना जमिनीपासून ३० से.मी. उंचीपासून पुढे ३०-३०
सेंमी उंचीवर एकूण चार-पाच नायलॉन बारीक दोऱ्या किंवा गॅलव्हनाईज तार बांधून घेऊन झाडांना आधार द्यावा. सरळ रेषेत बसवून घ्यावे.
वेळोवेळी छाटणी:
छाटणीचे सामान्यत: दोन प्रकार पडतात -
१) थेट छाटणी/कट बॅक
२) टप्प्या टप्प्याने कटबॅक / खोडांचे बेडिंग करणे
१) थेट छाटणी : या पद्धतीने रोपांची छाटणी आवश्यक त्या
उंचीवर केली जाते आणि त्यानंतर रोपांची पाण्याची गरज कमी झाल्यामुळे पाण्याची दैनदिन गरजसुद्धा कमी केली जाते. गुलाबाच्या प्रत्येक जातीमध्ये पहिल्यांदा कट बँक करताना ६० से.मी. उंचीवर
छाटणी करतात. कारण या उंचीपर्यंत झाडे / खोडे फारच कडक असतात. प्रत्येक छाटणीच्या वेळी काप घेताना तो पूर्वीच्या कापाच्या वरच्या बाजूस १५ से.मी. अंतर ठेवून घ्यावा. कारण अशा ठिकाणच्या फांद्या किंवाखोड छाटणीसाठी नरम असते.
२) टप्प्या टप्प्याने कट बँक: या छाटणीला बऱ्याचदा
चाकू छाटणी असे म्हणतात. कारण ही छाटणी, फुलांची काढणी करता करताच चाकूने केली जाते. छाटणीच्या या पद्धतीत वर दिलेल्या थेट पद्धतीत थोडासा बदल करून छाटणी केली जाते. यामध्ये सर्व फांद्या फुटवे यांची छाटणी एकाच वेळी करत नाहीत.
कारण काही फांद्या फुलोऱ्यात असतात तर काहींना फुले लागणार असतात. ही छाटणीसुद्धा ६० से.मी. उंचीवर करावी. कट बँक पद्धत वापरायची नसल्यास टप्प्या टप्प्याने ६० से.मी. उंचीवर खोडाचे बेडींग करावी. या बेडींग पद्धतीमुळेसुद्धा जाड खोडे व लांब दांड्याची फुले मिळतात.
मर झालेल्या फांद्यांची काढणी :
गुलाबाच्या झाडाच्या काही फांद्या रोगांचा प्रादुर्भाव
झाल्यानंतर वाळल्यासारख्या दिसतात. अशा फांद्यांची १५-२० दिवसांच्या अंतराने काढ़णी करावी. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाण्याची शक्यता असते, म्हणून वेळेवर त्या फांद्यांची काढणी
करावी.
वळण आणि छाटणी:
वळण:
गुलाब हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे गुलाबाला सुरुवातीला योग्य वळण देणे अत्यंत आवश्यक आहे. छाटणीमुळे रोगट फांद्याही काढल्या जातात. गुलाबाची छाटणी प्रामुख्याने पुढील कारणांसाठी करतात.
१) किडक्या, रोगट, मोडक्या, वाळलेल्या, कमकुवत आणि अनुत्पादित फांद्या काढून टाकल्या जातात.
२) झाडाला योग्य आकार देणे, उंच अथवा बाहेरच्या बाजूला वाढलेल्या फांद्या काढून टाकणे, संपूर्ण झाडांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आणि सर्व पानांवर सूर्यप्रकाश येण्यासाठी दाट वाढलेल्या फांद्या काढून टाकल्या जातात.
३) गुलाबाचे झाड हे बहुवर्षीय असून त्यापासून चार ते पाच वर्षेउत्पादन मिळते. गुलाबाच्या झाडाची वाढ भरपूर प्रमाणात होते. आणि झाडाला अनेक फांद्या फुटतात. गुलाबाचे झाड तसेच वाढू दिल्यास अतिशय कमी फुले लागतात. अशा वेळी झाडाची वाढ नियंत्रित करून झाडाला जास्तीत जास्त चांगल्या दर्जाची फुले येण्यासाठी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते.
छाटणी:
महाराष्ट्र सारख्या समशीतोष्ण हवामान असणारया भागात गुलाबाची दोन वेळा छाटणी केली जाते.
१) उन्हाळी छाटणी:
ही छाटणी उन्हाळा संपताना करतात. साधारणपणे मे
महिन्याच्या मध्यास ही छाटणी केली जाते. मात्र छाटणी लवकर  केल्यास कोवळ्या कोंबांना कडक उन्हामुळे इजा होते. या  छाटणीपासून फुलांचा हंगाम ऑगस्ट महिन्यापर्यंत चालतो. या हंगामातील पिकांवर पावसामुळे रोग आणि किंडीचा प्रादुर्भाव
मोठ्या प्रमाणात होतो. तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे फुलांचा दर्जा चांगला ठेवता येत नाही.
२)हिवाळी छाटणी :
फुलांचा पहिला बहार कमी झाल्यावर पावसाळा संपताना पुन्हा छाटणी केली जाते. हिवाळ्यात फुलांच्या वाढीसाठी हवामान अनुकूल असते. रोग व किडींचा तसेच तणांचा उपद्रव कमी होतो. ही छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला केली जाते. या फुलांचा
हंगाम जानेवारीपर्यंत चांगला राहतो आणि पुढे तो कमी होत जातो.गुलाबाच्या झाडाच्या फांद्याची आणखी तीन प्रकारे छाटणी केली जाते.
१) हलकी छाटणी : या प्रकारात झाडाच्या वाढलेल्या फांद्या सुमारे निम्म्या उंचीवर छाटल्या जातात. या छाटणीमध्ये झाडावर फांद्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे फुलांची संख्याही जास्त असते. मात्र फुले आखूड दांड्याची आणि लहान निपजतात.
२) जोरकस छाटणी : या प्रकारात झाडाच्या खोडाजवळ फांद्यावर ३-४ डोळे राखून छाटणी करतात. मोठ्या दांड्यावर मोठी‌ फुले आणण्यासाठी ही छाटणी केली जाते. मात्र फुलांची संख्या कमी मिळते.
३) मध्यम छाटणी : या प्रकारात फार खरडून अथवा अति उंचीवर छाटणी न करता मध्यम छाटणी केली जाते. काही फांद्या मध्यम उंचीवर छाटून तर काही फांद्या मुळापासून छाटून विरळणी केली जाते.
गुलाबाच्या झाडाची छाटणी करताना पुढील गोष्टी लक्षात
घ्याव्यात.
१) सर्वप्रथम छाटणीची वेळ आणि प्रकार निश्चित करावा.
२) निर्जीव झालेल्या सर्व फांद्यांची छाटणी करावी.
३) कीड आणि रोगाने ग्रासलेल्या फांद्या छाटून नष्ट कराव्यात.
४) कोवळ्या फांद्या तसेच दाटी करणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी.
५) झाडाच्या खुंटरोपापासून आलेल्या सर्व फांद्यांची तळापासून
छाटणी करावी.
६) चांगल्या डोळ्यांवर सुमारे ५ से. मी. अंतर ठेवून धारदार सिकेटरने ४५ अंशाचा कोन करून फक्त एकाच कापात छाटणी करावी.
७) छाटणी केल्यानंतर कापलेल्या भागावर बोर्डोपेस्टचा थर लावावा.