अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आंदोलन: देवा पवार


पाथर्डी शहरातील मध्यवर्ती समजला जाणारा अजंठा चौक( मेन रोड) येथे भाजीबाजारा कडे जाणाऱ्या मार्गावर मेन रोड रस्त्याचे काम चालू असताना बांधकाम विभागाने एक मोठा खड्डा खोदलेला आहे.
 भाजी बाजाराकडे जाणार्‍या- येणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो. त्या खड्ड्या जवळून जाताना चांगलीच कसरत करावी लागते. या खड्ड्यांमध्ये एखादा वाहन चालक वाहन घेऊन पडून मोठा अपघात होऊ शकतो. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व लवकरात लवकर हा खड्डा बुजवून घेण्याचा व अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला आदेश द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवा पवार यांनी दिला आहे.
 तसेच हा मेन रोड रस्ता म्हणजे वर्दळीचे ठिकाण आहे. येथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते. या चौकातून सरकारी दवाखाने कडे कोव्हिड केअर सेंटर कडे जाण्याचा रस्ता असल्याने या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडी व गर्दी होते. त्यातून अपघात व संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. तरीही संबंधित बांधकाम विभागाने अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.