नायब तहसीलदार जालिंदर रक्ताटे यांचे निधन


पाथर्डी शहरातील विजय नगर येथील नायब तहसीलदार जालिंदर रक्ताटे यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
 त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातू असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव हे आहे. ते महसूल विभागात कामाला होते व सेवानिवृत्त होताना तहसीलदार म्हणून पाथर्डी येथे सेवानिवृत्त झाले होते. त्यांना अध्यात्मिक क्षेत्राची प्रचंड आवड होती. तसेच ते स्वामी समर्थ पाथर्डी केंद्राचे संस्थापक, सेवेकरी होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता व ते सर्वांशी प्रेमाने वागायचे. श्री रत्न जैन विद्यालयाचे शिक्षक प्रशांत रक्ताटे यांचे ते वडील होत. त्यांची एक मुलगी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करते. पाथर्डीकरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.