माणिकदौंडी येथील बोरसे वाडी फाट्याजवळ एक पुरुष व महिला यांचा मृतदेह आढळला


पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी परिसरातील बोरसेवाडी गावाच्या फाट्यानजीक हॉटेल वाघजाई जवळ महिला आणि पुरुष अश्या दोन व्यक्तींची मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
  इंद्रजित वाल्मिक इंगळे वय ३५ रा. शिरोडा ता. कन्नड जि. औरंगाबाद ,रेखा जनार्धन उर्फ बाळासाहेब सानप वय ३० रा. भगवाननगर ता. पैठण जि. औरंगाबाद यांचे मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 
६ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच  तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार,पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. के.रांजणे, पोलिस कॉन्स्टेबल अतुल शेळके,राहुल खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत या मयत जोडप्याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचे काम केले.
 मृतदेहाच्या बाजूला विषारी बॉटल, मोटारसायकल(  एम. एच. १५ जी टी ४०२७  )क्रमांकाची घटनास्थळी आढळून आली असून विष प्राषण करून आत्महत्या केली आहे.इंद्रजित इंगळे हा 
आयडीएफसी बँकेत बचतगट वसुलीचे काम करत होता. सदर महिला ही मयताच्या घर मालक बाळासाहेब सानप यांची पत्नी असल्याचे व ती बहिणीस जामखेड येथे भेटुन येते असे सांगुन आली होती.घटनास्थळी दोन्ही मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. के. रांजणे करत आहेत.