कोरोनाविषाणू चे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात कोरोना  विरोधात लढा देण्यासाठी युद्ध सुरू आहे. त्यातच डॉक्टर, नर्स आणि पोलिस अशा विविध घटकांत नागरिक आपले योगदान देत आहे. 
या कोरोना बाधित रुग्णांना सेवा देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०८ रुग्णवाहिका चे चालक, डॉक्टर्स यांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेत डॉक्टर्स आणि एक रुग्णवाहिका चालक असे कार्यरत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिका करताही १०८ रुग्णवाहिका जीवनदायी ठरलेली आहे. त्यामुळे रुग्णाला त्वरित आरोग्यसेवा मिळत आहे. मात्र रुग्णवाहिकेचे चालक आणि रुग्णांची चढ-उतार करणे संबंधित त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे कार्य डॉक्टर करत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात या रुग्णवाहिकेचे कर्मचारी येताहेत असे असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देणारे डॉ. संतोष तुपेरे हे पाथर्डी येथील कोरडगाव येथे १५ वर्षापासून वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच ते महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिका सेवेत ६ वर्षापासून कार्यरत आहे. कोरोना बाधित रुग्ण, गर्भवती, अपघात, अन्य आजाराच्या गंभीर रुग्णासाठी डॉ. तुपेरे आपल्या १०८ रुग्णवाहिके सह ताबडतोब घटनास्थळी हजर होतात.
 आपल्या कोरडगाव येथील क्लिनिकमध्ये रुग्णसेवा तर देतातच पण त्यांनी १०८ च्या सेवे मध्ये सर्पदंश, हृदयविकार, विषबाधा अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आज पर्यंत पाथर्डी येथील १०८ रुग्णवाहिके वर कार्यरत असणारे डॉ. तुपेरे, डॉ. शिरसाट, डॉ. धाकतोडे यांनी सुमारे २५० प्रसूती रुग्णवाहिकेतच यशस्वीपणे केल्या आहेत. कोव्हिड च्या काळात समाजभान ठेवून त्यांचे काम अविरतपणे चालूच आहे. तालुक्यातील अनेक कोव्हिड रुग्णांचे प्राण वाचवण्या मध्ये डॉ. संतोष तुपेरे यांच्यासह डॉ. अमोल शिरसाट व डॉ. राजेंद्र धाकतोडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या रूग्णसेवेला सलाम.