आज दिवसभरात एका पोलीसासह ३४ कोरोना बाधित रुग्ण

आज पाथर्डी तालुक्यात दिवसभरात कोरोना चाचणीत ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर एक कोरोना रुग्ण नेवासा येथून उपचारासाठी पाथर्डी येथे दाखल करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या ३५ झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे,कोव्हीड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांच्या पथकाने १४६ जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  निष्पन्न झाले आहे.
कसबा ०४, भंडार गल्ली ०२,चिंचपूर रोड ०१,नाथनगर ०२,आनंदनगर ०३,शंकरनगर ०१,धान्यगोडावून जवळ ०१,टेकेगल्ली ०१,अकोला ०१,जांभळी ०१,ढाकणवाडी ०२,किर्तनवाडी ०१,मालेवाडी ०५,भालगाव ०१,तिसगाव ०१,जवखेड खालसा ०१,टाकळी मानून ०३,टेंभुर्णी (बीड) ०२,पिंपळनेर (बीड) ०१,बारदरी (अहमदनगर)०१ या भागातील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे.आज पर्यंत तीन पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.