पैठण तालुक्यातील हिंगणी गावच्या एका सामान्य कुटुंबातील मुलगी धनश्री सतिष शिंदे हिने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव च्या श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालय चापडगाव या वसतिगृहात राहून चापडगाव माध्यमिक विद्यालयात मराठी माध्यमात ९०. ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . तसेच मराठी, हिंदी , इंग्रजी ,विज्ञान या विषयात विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला . धनश्री शिंदे हिने पाचवी ते दहावी पर्यतचे शिक्षण वसतिगृहात राहूनच पूर्ण केले . या गुणवंत्त मुलीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या वसतिगृह अधिक्षिका अश्विनी अकोलकर यांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड . शिवाजीराव काकडे  , जि . प . सदस्या सौ . हर्षदाताई काकडे , विद्यालयाचे मुख्य ध्यापक रामकिसन धुमाळ , वसतिगृह विभाग प्रमुख रविद्र कुटे , विद्यालयाचे शिक्षक , हिंगणी गावचे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
दहावीच्या परिक्षेत धनश्री शिंदे प्रथम ...
 • Ramesh bramha