अंजनगाव शहरातील बाजार समितीच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा प्रशचिन्ह


अंजनगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्थानिक प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुर्जी भागात भरणारी जुनी भाजीपाला व्यापारपेठ स्थानांतरित केली होती. कित्तेक वर्षा पासून बाजार समितेने बांधून ठेवलेले भाजीपाला मार्केट मधील ओटे कित्तेक वर्ष रिकामे होते. मात्र भाजीपाला ठोक व्यापारपेठ स्थानांतर होण्याचे संकेत दिसतात वर्षानुवर्षे भाजीपाला अडतं चालविणाऱ्या अडत्यांनी त्या स्थलांतरनावर विरोध केला. मात्र प्रशासनाने भाजीपाला व्यापारपेठ जनहितार्थ स्थानांतरित केली. बाजार समितीने कायदेशीर रित्या बाजार ओट्यांचा लिलाव केला ज्यामध्ये नवीन भाजीपाला अडत्यांची वर्णी लागली. भाजीपाला अडतं व्यापारातील एकाधिकार संपला आणि नवीन अडत्यांनी जोमाने व्यापार सुरु केला. मात्र बाजार समितीच्या सचिवांचे त्या जनहितार्थ कार्यास कायमचा विरोध निदर्शनास आला. नवीन अडत्यांना मानसिक त्रस्त करणाऱ्या बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला मार्केट सफाई बाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. बाजार समिती मधील सर्व पाणी एका नालीत काढून प्रथम क्रमांक असणाऱ्या ओट्यांचे लाईन मध्ये काढले. ज्यामुळे मोठी असुविधा निर्माण झाली असून घाणीच्या साम्राज्याने सर्वत्र दुर्गंध पसरलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिक त्या व्यापारपेठे मध्ये जाणे टाळतात. अशात भाजीपाला व्यापारपेठ मध्ये येजा करण्यासाठी असणारे गेट बाजार समितीने बंद केले. त्यामुळे भाजीपाला व्यापारी वर्गावर हेतुपुरःसर अन्याय केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशात एक भाजीपाला अडत मालक काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झल्यामुळे बाजार समितीने भाजीपाला व्यापारपेठ बंद ठेवली होती. त्या काळात स्वच्छता करणे क्रमप्राप्त होते. मात्र व्यापारपेठ त्याठिकाणी येऊ नये ह्यासाठी  प्रयत्न करणाऱ्या सचिवाने कोणतेही आवश्यक कार्य न करता मात्र टाईमपास केला त्यामुळे त्या भाजीपाला व्यापारपेठे मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यासाठी दोषी बाजार समिती प्रशासन असल्याचे दीसत आहे. कायद्याचा बिमोड करणाऱ्या त्या बाजार समिती सचिवास शेवटी पाठबळ कोणाचे? व त्यावर कायदेशीर कार्यवाही का होत  नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.