ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मुंबई ऊपननगर जिल्हाधिकारी यांना निवेदन.

दिनांक १० ऑगस्ट रोजी  ऑल इंडिया पॅंथर सेना चे मुंबई संपर्कप्रमुख आकाश सोनवणे यांनी उपनगर जिल्हाधिकारी यांना नांदेड लोह तालुका माळेगाव याठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी.


सदर ठिकाणी शासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा नवीन पुतळा बसवण्यात यावा व संरक्षण नेहमीसाठी देण्यात यावे.संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना करण्याचा सपाट ह्या मनुवादी लोकांनी सुरू केली आहे.त्या पर्शभूमिवर ज्याज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा,या नंतर जर असे प्रकार घडल्यास ऑल इंडिया पँथर सेना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा या मागणी निवेदातून देण्यात आला.या वेळी प्रमुख उपस्थिती प्रवीण शिंदे ऑल इंडिया पँथर सेना मुंबई जिल्हा उपाध्यक्ष,संतोष गायकवाड मुंबई उपाध्यक्ष,आकाश सोनवणे मुंबई संपर्क प्रमुख,ज्योती गुप्ता सोनवणे ईशान्य मुंबई महिला संघटक,राहुल पाटोळे विक्रोळी वॉर्ड क्रमांक ११७ अध्यक्ष,इत्यादी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.