अंजनगाव 
शहराची बेकायदेशीर भाजीपाला अडत गावाला ग्रहण लावणार. संपूर्ण भारतात सुरू असलेली कोरोनाची महाभयंकर परिस्थिती पाहता आज अंजनगाव तालुक्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव  शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता ही सद्य स्थितीत संकटात जीवन जगत आहे. अशातच ह्या संकटावर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने गेली सहा महिण्यापूर्वीच भाजीपाला मार्केट हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवण्यासाठी जागेची उपलब्धता करून दिली होती. तेथे काही प्रमाणात सोशल डिस्टनसींगचा फज्जा सुद्धा झाला. अशात  न. प.,  महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त रित्या कार्यवाही करून त्यावर उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावला होता. अशा परिस्थितीत गेल्या तीन दिवसापूर्वी ह्याच भाजीपाला मार्केट मधील एका अडत दुकानदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने व कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील सुचनेपर्यंत भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अडत दुकानदारच कोरोना ग्रस्त असतांना तो कोनाकोणाच्या संपर्कात आला असेल. हायरिक्स, लोरिक्स याद्या बनविणे सुरु आहेत. मात्र अशा भीतीच्या वातावरणात काही महाभाग अडत दुकानदारांनी  आपला स्वतःचा स्वार्थासाठी  आपली अडत दुकाने ही शहरातील सुर्जी भागातील ईदगाहा समोरील खुल्या जागेवर व अकोट रोडवरील गुलाब कृष्ण लॉन समोरील जागेत कोणतेही सोशल डीस्टेनसिंग व कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता भाजीपाला बाजार भरवण्यात येत आहे. ह्याबाबत  न प प्रशासनाकडून त्यावर कोणताही वचक दिसून आला नाही. महसूल विभाग ह्या जागेपासून हाकेच्या आवाजावर असताना देखील प्रशासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केल्याचे दीसत नाही. त्या ठिकाणी होणाऱ्या भयंकर गर्दीचे स्वरूप पाहता शहरात येणाऱ्या काळात फार मोठी भयानक स्थिती निर्माण होणार हे निश्चितअसून स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याचे दीसत आहे.    गेली तीन दिवसांपासून भाजीपाला मार्केट मधील अडत दुकानदार व नगरसेविका पती कोरोना  पॉझिटिव्ह असल्यामुळे  भाजीपाला विक्री ही शहरातील पुर्णपणे बंद केली आहे. परंतु सदरचे  ठोक भाजीपाला विक्री करणारे विक्रेते हे चोरून लपून  सुर्जी येथील ईदगाहा समोरील जागेत भाजीबाजार भरवत असल्याची माहिती मिळाली असून  जे काही दुकानदार नियमाचे उल्लंघन करत असतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेल मुख्यधिकारीb श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी सांगितले. मात्र नगर पालिका त्यांचे कर्मचाऱ्यांनी त्यांचे लक्षात हा गैरप्रकार लक्षात का आणून दिला नसावा हे प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासनाचे ज्यामध्ये काही साटेलोटे तर नाही ना अशी सर्वत्र चर्चा होत आहे.