पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील सय्यद रशीद महंमद यांच्या न्यू परफेक्ट  टायर दुकानाच्या गोडाऊन मधील  छता वरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने  ट्यूब व टायरची चोरी केली आहे.
 वरील वृत्ता विषयी  अधिक माहिती अशी की, सय्यद रशिद यांचे करंजी येथे न्यू परफेक्ट नावाचे टायरचे दुकान आहे. ते   टायरचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका चालवतात. त्यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून राहत्या घरी गेले. तसेच बुधवारी ५ ऑगस्ट रोजी दुकानाचा बंद वार असल्याने त्यांनी दुकान उघडले नाही. परंतु आज सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडून आत प्रवेश केला असता  टायर दुकानाचे गोडाऊन मधील छताच्या वरील पत्रा कोणीतरी उचकटलेला दिसून आला व गोडाऊन मधील टूब, टायर चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ९३,२६० रुपये किंमतीचे त्यात सी ए टी कंपनीचे, केंदा कंपनीचे वेगवेगळ्या साईजचे नवीन टायर दि.४ ऑगस्टच्या   सायंकाळी पाच  ते ६ ऑगस्ट  रोजी सकाळी नऊ वाजायच्या दरम्यान गोडाऊन मधील  ट्यूब व टायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत सय्यद रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे व पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद चव्हाण हे करत आहेत.
करंजी येथील न्यू परफेक्ट टायर दुकानात चोरी
 • Ramesh bramha