आनंद विद्यालय अहमदनगरचा हर्षल बोरुडे विद्यालयात व केंद्रात पहिला


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला


सदर परीक्षेला हर्षल राजेंद्र बोरुडे यांनी ९६.६० टक्के गुण मिळवून श्री आनंद विद्यालय गुलमोहर रोड, अहमदनगर शाळेत प्रथम क्रमांकाने व केंद्रांमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल त्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांनी अभिनंदन केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगावचे सभापती अनिल मडके यांनी त्याचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याला मिळालेल्या यशाबद्दल त्याने केलेला प्रश्नपत्रीका सराव, वेळेचे नियोजन, विषयानुरूप वेळेचे नियोजन, सराव सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचे आशीर्वाद याला मिळाले. ज्याप्रमाणे अभ्यासामध्ये हुशार आहे, त्याचप्रमाणे चित्रकला मध्ये देखील त्याने अनेक यश संपादन केलेले आहेत. विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये त्याने क्रमांक मिळवलेले आहेत. त्याचे वडील राजेंद्र बोरुडे हे आनंद विद्यालय चिचोंडी (शिराळ) येथे गणित विषयाचे शिक्षक आहेत व आई सौ. बोरुडे या काकासाहेब मस्के विद्यालयांमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. हर्षलचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.