महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला 
 पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील संत तुकाराम विद्यालयाचा निकाल १०० टक्के असा उत्कृष्ट लागला असून शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.
विद्यालयातील मुलींनी परीक्षेत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. यात कु. पूनम अनिल पाठक ८६.६० टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक कु. प्रिया सिताराम पाठक ८५.६० टक्के तर तृतीय क्रमांक कु. प्रियंका दिगांबर मुनमुने ८५.२० टक्के मिळवले. विद्यालयाचे दहावी परीक्षेस (सेमी इंग्रजी वर्ग) ४०  विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत, तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे घाटशिरस चे ग्रामस्थ, संस्थेचे सचिव अॅड. प्रताप काका ढाकणे व पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. 
दरम्यान दहावीच्या परीक्षेत ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत ढमाळ, ज्येष्ठ शिक्षक सुभाष ढाकणे, प्रसाद पानगे, जयश्री काळोखे आदी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पांचा गुच्छ देऊन व पेढे भरवून शिक्षकांनी त्यांचा आनंद द्विगुणित केला व यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुजन वर्ग यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.