जय भद्रा ग्रुप व स्वामी समर्थ तर्फे भव्य रक्तदान शिबीर...

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील गेल्या कित्येक वर्षापासुन जय भद्रा ग्रुप तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
या वर्षी सुद्धा श्रावण मासा निमित्त तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड रक्ताचा तुटवडा शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी जाणवत असल्याचे दिसून येते रक्ताचा तुटवडा जानवत असल्याने जय भद्रा ग्रुप व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सोशल डिस्टनसिंग ने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे,व त्यांचे सहकारी तसेच जय भद्रा ग्रुप चे सर्व  सदस्य व श्री स्वामी समर्थ केंद्र चे सर्व सहकारी यांची  या शिबिरात उपस्थिती होती.या शिबीरामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले
सर्व रक्तदातांना प्रमाणपत्र व जय भद्रा ग्रुप तर्फे ट्राँफी देण्यात आले