पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील पोलीस कॉलनी येथील मूर्तिकार शरद विटेकर हे गणपती बाप्पा यांची मूर्ती बणविण्याकरिता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळोवेळी विविध नियमावली पाहण्यास मिळत आहे या सर्व नियमावलीत अधीन राहून त्यांचे काम प्रगतीच्या दिशेने चालू असल्याचे दिसून येते.गणपती बाप्पाच्या आगमन लवकरच होणार आहे.या अनुषंगाने मूर्तिकार शरद विटेकर यांनी ४ फूट ते ६ फुटा पर्यंतच्या मुर्त्या त्यांनी तयार करून अंतिम टप्प्यात रंगकाम चालू आहे.गणपती बाप्पा यांच्या मूर्ती च्या किमती ही नागरिकांना परवडतील अस्या आहेत .तरी सर्व गणेशभक्तांना त्यांनी विनंती केली आहे की एकदा अवश्य भेट आपण याठिकाणी दयावी.अशी माहिती खरा सामना शी बोलताना दिली.