शिक्षकांनी अविरत विद्यार्थीपणाचा वसा जपत आपल्या व्यक्तिमत्वास सर्वांगिण उंची प्रदान करत विविधांगी वाचन,उपक्रम यांनी शिक्षणक्षेत्र अधिक समृद्ध करावे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले. शिक्षकनेते मधुकर वालतुरे यांच्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गंगापूरच्या वतीने आयोजित ५९ गुणवंत व उपक्रमशील शिक्षक व सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण शनिवारी ४ रोजी गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी विचारमंचावर जि.प.स्थायी समिती सदस्य मधुकर वालतुरे, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल,न्यायाधिश निलेश दहातोंडे,नगराध्यक्ष वंदना पाटील,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अप्पासाहेब पाचपुते,गटशिक्षणाधिकारी अनिल सकदेव,राज्य संघटक विष्णू बोरूडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ज्या शिक्षकांनी चांगले काम केले त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक चांगले काम करतात त्यातून उत्कृष्ट काम करणार्यां शिक्षक व शाळांची निवड या मानाच्या पुरस्कारासाठी झाली आहे.गंगापूर तालुक्याने राज्याला अनेक चांगले अधिकारी आणि पदाधिकारी दिलेले आहेत.त्या अधिकारी आणि पदाधिकार्यांना घडविण्याचे काम तालुक्यातील शिक्षकांनीच केलेले आहे अशा शब्दात मधुकर वालतुरे यांनी शिक्षकांचे गुणगान केले.
तर तालुक्यातील प्रत्येक शिक्षकांनी आपल्या शाळेला वाबळेवाडीपेक्षाही सरस बनवत गंगापूर पॅटर्न निर्माण करत शिक्षणक्षेत्रात दीपस्तंभी कार्याची मुहुर्तमेढ रोवावी.यासाठी प्रशासनाच्या मदतीचा हात सदैव तत्पर राहील अशी ग्वाही शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. सूत्रसंचालन शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन राजेश हिवाळे यांनी केले.प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय भडके,जिल्हा कार्याध्यक्ष जे.के.चव्हाण यांनी केले तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष हारूण शेख यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व नियोजनासाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमशील व गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक :शेख महेबुब शेख चाँद,शुभांगी सगनाराव ढाले,वंदना एकनाथराव तारो,शामराव जगन्नाथ आहेर,रामदास कृष्णा कापडणीस ज्योत्स्ना ज्ञानदेव वाघमारे,शोभा सूर्यभान मगर,सुभाष भानुदास मोरे,निलेश विजयसिंग कहाटे,संगीता शंकरराव भालेराव,आयशा परवीन अब्दुल कय्यूम,मोठाभाऊ वामन देसले,राजेंद्र आसाराम साध्ये,संगीता शिवराम खेडकर,भावना रामदास गढरी,उदय भास्करराव गोर्डे,नंदलाल रामलाल सलामपुरे,वैशाली दिनकर परीट,हमनाबाई माणिकराव गोविंदवार,लक्ष्मण उत्तमराव सदभावे,सतीष सयाजी जपकर,संगीता आत्माराम दिसागज,अंजली सुरेशराव पुऱ्हे,तुळशीदास दादा पाठे,उमेश बाबुराव पगारे,वाल्मीक बाबुराव कुर्णे,सारीका श्रीधर काकडे,प्रज्ञा भास्कर जासूद,दिलीप कमलाकर धर्माधिकारी,आबाजी दगाजी सोनवणे,सुवर्णा भाऊसाहेब ठाणगे,जयप्रभा त्रिंबकराव कोकाटे,कडुबा तुकाराम हारदे,अजितकुमार माणिकराव राजळे,संगीता राधेशाम इंगळे,सारीका विद्यासागर दर्जे,जगन्नाथ चंद्रभान केथा,नितीन रामेश्वर तागडे,सुरेखा बाजीराव मगर,लक्ष्मण मन्सीराम जावळे,उषा पतिंगराव देशमुख,दिगंबर दगडू बारसे,विलास शंकरराव जाधव,मधुकर बळीराम सुरडकर उपक्रमशील व सुंदर पुरस्कार प्राप्त शाळा :जि.प.प्रा.शा.बाबरगाव,अगरकानडगाव,वरखेड,झोडेगाव,एकलहेरा,सुलतानाबाद,वसुसायगाव,घाणेगाव,पाचपीरवाडी,जिकठाण,जोगेश्वरी,पुरी,कनकोरी,धनगरपट्टी,महालक्ष्मीखेडा,मुर्शिदाबाद,शिल्लेगाव,गाजगाव,माळीवाडगाव विशेष सन्मानित शाळा:जि.प.प्रा.शा.आसेगाव,शिवाजीनगर,गाजरमळा,महंमदपूर,चिंचखेडा,पीरवाडी,लिंबेजळगाव,बोरगाव,सिरसगाव वस्ती,गंगापूर नं.२,लासूरगाव आदी आहेत.
शिक्षकांनी अविरत विद्यार्थीपणाचा वसा जपावा --- अंजली धानोरकर